शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘उमेद मॉल्स’ उभारणार; महिलांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होणार-“अनिताताई माळगे
इचलकरंजी:
महिला सक्षमीकरण व ग्रामीण भागातील महिलांच्या हातांना बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल्स’ उभारण्यात येणार आहेत.
या मॉल्समुळे बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला, खाद्यपदार्थ, वस्त्रे व इतर उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच महिला उद्योगधंद्यासाठी नव्या संधी निर्माण होतील, असे शिवसेना महिला सक्षमीकरण समन्वयक अनिताताई माळगे यांनी सांगितले.
माळगे यांनी सांगितले की, या योजनेसोबत नाबार्ड, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, NURLM, स्मार्ट प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी महिला उत्पादक कंपन्या उभारून शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार धैर्यशील माने व जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरणाचा आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा संपर्कप्रमुख अनिताताई माळगे, कोल्हापूर महिला जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे, शहरप्रमुख स्नेहांकिता भंडारे, तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
उमेद मॉल बैठकीप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








