गणेशोत्सव २०२५ अंतर्गत पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची यंत्रणा सुसज्ज-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील
इचलकरंजी
इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही पर्यावरण पुरक आणि भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या अनुषंगाने मंगळवार दि.२ सप्टेंबर २०२५ रोजी शहरातील घरगुती श्रीगणेश मुर्ती विसर्जन होणार आहे. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी नियुक्त केलेल्या सर्व नियंत्रण व समन्वय अधिकारी कर्मचारी तसेच याकामी महानगरपालिका प्रशासनास नेहमीच सहकार्य करणाऱ्या सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समवेत श्रीगणेश विसर्जन उत्साही आणि आनंदी वातावरणात व्हावे या कामाच्या नियोजना करिता महानगर पालिका प्रशासनाची महत्वपुर्ण बैठक नाट्यगृहात आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे,उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सदर बैठकीत घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक त्या सुचना करणेत येऊन विसर्जन सोहळ्यासाठी महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवणेचे आयोजन करणेत आलेले आहे.
यावर्षी श्रीगणेश मूर्ती विसर्जन शहापूर खणीसह शहरातील विविध ५२ ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने ठेवणेत येणाऱ्या कृत्रिम विसर्जन कुंडात करणेचे नियोजन करणेत आलेले आहे. शहापुर खण येथील विसर्जन स्थळी तसेच गणेश मूर्ती कृत्रिम विसर्जन कुंड तसेच निर्माल्य कुंड असलेल्या सर्व ठिकाणी दोन शिप्टमध्ये जवळपास ६०० पूर्णवेळ अधिकारी- कर्मचारी तसेच स्वयंसेवक यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत.
यामध्ये आरोग्य विभाग , बांधकाम विभाग, वाहन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, आपत्कालीन विभाग आणि अतिक्रमण विभाग त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय यांचा समावेश आहे. त्याचबरोबर १६ आयशर टेंपो,५ ट्रॅक्टर, २ यांत्रिक बोटी, २ रुग्ण वाहिका,१ अग्निशमन वाहन अशी यंत्रणा सुसज्ज ठेवणेत येणार आहे.
यावेळी सहा आयुक्त रोशनी, गोडे सहा आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, सहा संचालक नगररचना प्रशांत भोसले, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, विद्युत अभियंता इसरार बेग, शाखा अभियंता बाजी कांबळे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, सहा.आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, विजय पाटील आदी उपस्थित होते.
तरी प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही इचलकरंजी
शहरातील नागरिकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन शहापुर खण येथे किंवा आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्ती विसर्जित करून पर्यावरण पूरक आणि आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







