अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इचलकरंजीत नेत्रदान व प्रत्यारोपण यशस्वी.
इचलकरंजी :
अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इचलकरंजी येथे नेत्र विभागाकडून एक अलौकिक कामगिरी पार पडली. तज्ञ नेत्रतज्ज्ञ डॉ. राजकुमार पाटील व डॉ. पूजा कुलकर्णी यांच्या टीमने कॉर्निया डोनेशन व प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
सामाजिक व आरोग्य क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या अलायन्स हॉस्पिटलने आता अवयवदान क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. नेत्रदान व प्रत्यारोपण सुविधा सुरू करून अंधत्वावर मात करण्यासाठी एक नवीन दिशा दाखवली आहे.
डॉक्टरांच्या मते, मृत्यूनंतर कोणताही व्यक्ती आपले डोळे दान केल्यास दोन व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळू शकते. “फक्त एक छोटा निर्णय पण त्याचा परिणाम दोन जीवांना नवजीवन देणारा ठरतो,” असा संदेश हॉस्पिटलतर्फे देण्यात आला. “डोळे दान करा – दृष्टी द्या – अमर व्हा” हा प्रेरणादायी संदेश रुग्णालयाने दिला आहे.
या उपक्रमामध्ये चेअरमन डॉ. बी.एस. कित्तुरे, सीईओ आयेशा राऊत, डायरेक्टर व नेत्रतज्ज्ञ डॉ. राजकुमार पाटील, सदानंद गायकवाड तसेच पूर्ण अलायन्स हॉस्पिटलची टीम परिश्रमपूर्वक कार्यरत आहे. समाजामध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती होऊन अधिकाधिक अंध व्यक्तींना प्रकाश मिळावा हा उद्देश रुग्णालयाने व्यक्त केला आहे.
यशस्वी प्रत्यारोपणानंतर अलायन्स हॉस्पिटलची टीम
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








