डी के ए एस सी महाविद्यालयाच्या कराटे खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मोठे यश संपादन केले. इचलकरंजी महानगरपालिका शालेय शासकीय कराटे स्पर्धा नुकत्याच राजीव गांधी भवन येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील १९ वर्षाखालील गटामध्ये कु. हर्षदा पुजारी व कु. श्रेया लठ्ठे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर १७ वर्षाखालील मुली या वयोगटात कु. ज्ञानदा पुजारी व १७ वर्षाखालील मुलांच्या गटात ऋषिकेश धारवट यांची देखील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
Advt
सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस के. खाडे यांनी अभिनंदन केले. यावेळी ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. शशिकांत कुंभार उपस्थित होते.खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. विनायक भोई व प्रा. मुजफ्फर लगीवाले यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. महाविद्यालयातील प्राध्यापक स्टाफ प्रशासकीय स्थान व विद्यार्थी विद्यार्थिनींनी खेळाडूंच्या या यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कराटे स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्राचार्य खाडे व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







