“श्री गणेशा आरोग्याचा” शिबिराअंतर्गत इचलकरंजी येथे यशवंत कॉलनी गणेश मंडळात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
इचलकरंजी:
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा ना.श्री प्रकाश आबिटकर यांची अभिनव कल्पना आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वतीने इचलकरंजी मधील यशवंत कॉलनी गणेश मंडळ येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या मध्ये ६० नागरिकांची तपासणी करण्यात आली.
Advt
यामध्ये रक्तातील विविध चाचण्या, रक्तदाब तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे या शिबिराप्रसंगी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी आर.बी.एस.के चे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर बोरकर डॉ. सविता सिदनाळे रुग्णालयाच्या सहा. अधिसेविका श्रींम. सीमा कदम, बालरुग्ण तज्ञ परिचारिका श्रींम. सोनल माने, रुग्णालयातील अधिपारीचारक प्रयोगशाळेतील कर्मचारी रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते तसेच यशवंत कॉलनी गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. राजू स्वामी उपाध्यक्ष श्री. राजू माने मंडळाचे खजिनदार श्री. धनंजय कुलकर्णी, सेक्रेटरी श्री. शितल दतवाडे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री. कपिल शेटके मंडळाचे सर्व कार्यकर्ते भागातील सर्व गणेशभक्त उपस्थित होते.
यशवंत कॉलनी गणेशोत्सव मंडळात आरोग्य शिबिर संपन्न झाले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








