ICHMH51NEWS.IN
9921600800

घरगुती गणेश विसर्जनासाठी इमनपा सज्ज ५२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

घरगुती गणेश विसर्जनासाठी इमनपा सज्ज ५२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय

इचलकरंजी–
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरभरात तब्बल ५२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी आपल्या घरगुती मूर्ती या कृत्रिम कुंडात अथवा शहापूर खण येथे विसर्जित करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.

महानगरपालिकेने शहरातील विविध वॉर्डांमध्ये खालीलप्रमाणे कृत्रिम विसर्जन कुंड उभारले आहेत –

१) महाराणा प्रताप चौक (वॉर्ड १)
२) मरगुबाई मंदिर (वॉर्ड २)
३) महासत्ता चौक (वॉर्ड ३)
४) नारायण टॉकीज (वॉर्ड ४)
५) महात्मा गांधी पुतळ्याजवळ (वॉर्ड ५)
६) डीवायएसपी ऑफिस जवळ (वॉर्ड ५)
७) बिग बाजार (वॉर्ड ९)
८) सांगली नाका (वॉर्ड ९)
९) हत्ती चौक (वॉर्ड १२)
१०) छत्रपती संभाजी चौक (वॉर्ड १२)
११) लिंबू चौक (वॉर्ड १३)
१२) वैरण बाजार (वॉर्ड १३)
१३) दुर्गा माता मंदिर (वॉर्ड १३)
१४) धर्मराज चौक (वॉर्ड १४)
१५) तांबे माळ (वॉर्ड १४)
१६) बंडगर माळ चौक (वॉर्ड १५)
१७) किसान चौक (वॉर्ड १५)
१८) अण्णा रामगोंडा भाजी मार्केट (वॉर्ड १६)
१९) तीन बत्ती चौक (वॉर्ड १६)
२०) षटकोन चौक (वॉर्ड १६)
२१) शाहू हायस्कूल (वॉर्ड १६)
२२) अनुपम हॉटेल समोर, छ. शाहू पुतळा (वॉर्ड १७)
२३) गंधर्व हॉटेल समोर (वॉर्ड १७)
२४) शिव मंदिर समोर (वॉर्ड १९)
२५) श्रद्धा कॉलनी गणपती मंदिर (वॉर्ड १९)
२६) श्री शिवतीर्थ चौक (वॉर्ड १८)
२७) अटलबिहारी चौक, स्टेशन रोड (वॉर्ड १८)
२८) बालाजी प्रोसेस चौक (वॉर्ड १८)
२९) सरस्वती हायस्कूल (वॉर्ड २०)
३०) साई मंदिर (वॉर्ड २०)
३१) शिवा काशिद रोड (वॉर्ड २०)
३२) मराठा चौक (वॉर्ड २१)
३३) मनेरे हायस्कूल (वॉर्ड २१)
३४) मारुती मंदिर (वॉर्ड २१)
३५) सोनपावली मंदिर, खंजिरे मळा (वॉर्ड ६)
३६) ब्रह्मकुमारी मंदिर, हॉकी मैदान (वॉर्ड ६)
३७) के.एल. मलाबादे चौक (वॉर्ड ७)
३८) वेताळ पेठ मंदिर (वॉर्ड ७)
३९) शिव मंदिर समोर, मधुबन सोसायटी (वॉर्ड ८)
४०) लाखे नगर (वॉर्ड ८)
४१) वर्धमान चौक (वॉर्ड १०)
४२) थोरात चौक (वॉर्ड ११)
४३) राधाकृष्ण चौक (वॉर्ड ११)
४४) डेक्कन सिग्नल जवळ (वॉर्ड २२)
४५) गणेश नगर गल्ली नं. ४ (वॉर्ड २२)
४६) विकास नगर, नागोरी किराणा स्टोअर्स (वॉर्ड २२)
४७) गणपती मंदिर, जावईवाडी (वॉर्ड ২৩)
४८) सावली सोसायटी चौक (वॉर्ड २३)
४९) डोनपुडे घराजवळ (वॉर्ड २३)
५०) दत्तनगर रिक्षा स्टॉप (वॉर्ड २४)
५१) शहापूर गाव चावडीजवळ (वॉर्ड २५)
५२) तोरणा नगर (वॉर्ड २५)

नागरिकांनी आपल्या घराजवळील विसर्जन कुंडाचा उपयोग करून गणेशमूर्तींचे विसर्जन करावे व पाण्याचे प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा