शांतारामबापूंना १४ व्या स्मृतिदिनी प्रबोधिनीत आदरांजली
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस , थोर विचारवंत स्वातंत्र्य सैनिक आचार्य शांताराम गरुड हे प्रबोधकांचे प्रबोधक होते. भारतीय समाज आणि संस्कृती, भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, भारतीय राज्यघटनेतील मूल्ये , भारतीय समाज आणि संस्कृती यासह गांधीवादापासून मार्क्सवादापर्यंत आणि लोकशाही समाजवादापासून रॉयवादापर्यंत विविध इझमची त्यांनी केलेली मांडणी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि त्यातील मूल्ये याबाबत पाच दशकांपूर्वी त्यांनी सुरू केलेले प्रबोधन आज राजकारण व समाजकारणातील केंद्रविषयी बनलेला आहे हे त्यांचे द्रष्टेपण होते. त्यांची विचारधारा पुढे घेऊन जाणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते आचार्य शांताराम गरुड यांच्या चौदाव्या स्मृतिदिनी अभिवादन सभेत बोलत होते. प्रारंभी प्रा.रमेश लवटे यांच्या हस्ते आचार्य शांताराम गरुड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पांडुरंग पिसे, शकील मुल्ला, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी ,कविता डांगरे, प्रमोद घालवाडकर, शिवाजी कदम, सूर्यकांत घोडके ,एम. बी.कुंभार, जयवंत सोनटक्के आदी उपस्थित होते.
स्व.शांताराम बापुना अभिवादन करताना प्रसाद कुलकर्णी,प्रा.रमेश लवटे,पांडुरंग पिसे,सौदामिनी कुलकर्णी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







