आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
इचलकरंजी (ता.१८) :
इचलकरंजी महानगरपालिका शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले.
दिव्यांशी मनोज जांगीड हिने तायक्वांदो क्रीडा प्रकारात विभागीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले. रसिका सचिन माळी व मानस सचिन माळी यांनी अनुक्रमे रोप मल्लखांब व मल्लखांब या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला. तसेच नील सुनील सोनटक्के याने रायफल शूटिंग स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला.
Advt
विजयी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. किरण माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संचालिका माधवी होसमणी व मुख्याध्यापिका राधिका भिसे उपस्थित होत्या.
यशस्वी विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे चेअरमन किरण माळी,माधवी होसमणी,राधिका भिसे,निकिता सिंग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







