ICHMH51NEWS.IN
9921600800

नवरात्रोत्सवात कोल्हापुरात ‘स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम’चा शुभारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नवरात्रोत्सवात कोल्हापुरात ‘स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम’चा शुभारंभ

कोल्हापूर:

नवरात्रोत्सवाच्या काळात श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पार्किंग समस्येवर तोडगा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील पहिला ‘स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर शहरात सुरू करण्यात आला आहे.अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रभारी नंदकुमार मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रणालीतून भाविकांना पार्किंग जागा शोधणे, वाहन सुरक्षितपणे उभे करणे आणि बाहेर काढणे अधिक सोपे होणार आहे. शहरातील पार्किंग स्थळांवर QR कोड लावले जाणार असून भाविक हे स्कॅन करून पार्किंगचे ठिकाण शोधू शकतील. तसेच https://parking.mahabooking.com या संकेतस्थळावर पार्किंगची उपलब्धता, गुगल मॅप लिंक व वाहन प्रकाराची माहिती मिळेल.

पार्किंग ठिकाणी पोहोचल्यानंतर स्वयंसेवक वाहनधारकाची नोंद घेतील. त्यानंतर वाहनधारकाला WhatsApp वर पार्किंग पास मिळेल. वाहन पार्किंगमध्ये येताच अथवा निघताच उपलब्ध जागांची संख्या आपोआप अपडेट होणार आहे. वाहन बाहेर काढताना QR कोड स्कॅन करून पार्किंग चार्जची स्लिप देखील WhatsApp वर मिळणार आहे.

या आधुनिक प्रणालीमुळे वाहतूक कोंडी टळण्यास मदत होणार असून प्रशासनालाही वाहनांचा मागोवा घेणे व व्यवस्थापन करणे सोपे होईल. भाविकांना सुरक्षित आणि सुलभ पार्किंगची सुविधा मिळाल्याने नवरात्रोत्सवातील गर्दीवर प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा