ICHMH51NEWS.IN
9921600800

भरधाव कारची तीन मोटरसायकलींना धडक – दोन जखमी, ६५ हजारांचे नुकसान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भरधाव कारची तीन मोटरसायकलींना धडक – दोन जखमी, ६५ हजारांचे नुकसान

इचलकरंजी:

कबनुर ते शाहुपुतळा जाणाऱ्या रस्त्यावर कमल खानावळ समोर शनिवारी रात्री उशिरा भरधाव कारने तीन मोटरसायकलींना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन तरुण किरकोळ जखमी झाले असून सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कारचालक मयुरेश भरत संगाज (रा. लायकर टॉकीज मागे, इचलकरंजी) असा आहे.

फिर्यादी आकाश श्रीकांत पिंगट (वय २५, रा. ए.एस.सी. कॉलेज जवळ, पाटील मळा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रात्री सुमारे ११ वाजता आरोपीने आपल्या ताब्यातील स्वीप्ट डिझायर (क्र. MH-12-QF-5786) ही कार बेदरकारपणे व वेगात चालवून त्यांच्या मोटरसायकलला (क्र. MH-51-D-5934) मागून धडक दिली. त्यानंतर त्याच कारने MH-09-FV-7610 व MH-09-DS-0431 या मोटरसायकलींनाही धडक दिली.

अपघातात फिर्यादी आकाश पिंगट आणि साक्षीदार अब्बास हुसेन पटेकरी (रा. भोने मळा, इचलकरंजी) किरकोळ जखमी झाले. तिन्ही मोटरसायकलींचे मिळून सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर आरोपी कार घेऊन पळून गेला.

या प्रकरणी  गुन्हा दाखल झाला असूनबतपास पो.हे.कॉ. रोटीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रभारी अधिकारी सपोनि वायदंडे आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा