प्रेमसंबंधाच्या रागातून नातेवाईकावर कोयत्याने हल्ला
इचलकरंजी
कोरोची (ता. हातकणंगले) – शहापूर पोलीस ठाणे हद्दीत पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून नातेवाईकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. फिर्यादी सागर रामचंद्र भिसे (रा. तिनविहीरी जवळ, कोरोची) यांच्यावर आरोपी अक्षय रेणके व मंथन रेणके (रा. कृष्णानगर, शहापूर) यांनी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमीवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार गायकवाड करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







