राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न….
इचलकरंजी : येथील श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मा वर्षा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी सामाजिक जाणीवेतील एन एस एसचे स्थान या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी एन एस एसचे महत्त्व स्पष्ट करताना मागील १० वर्षातील विद्योदय मुक्तांगण परिवार फौडेशन अब्दुलला ट या ठिकाणी केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला.
Advt
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ धीरज शिंदे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा स्वाती हाळवणकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ प्रियांका कुंभार यांनी केले.याप्रसंगी प्रा हेमा देसाई, प्रा बिणा बोरगे, डॉ सविता आंबोकर, प्रा वर्षा पोतदार,प्रा संभाजी निकम, डॉ मनोज जाधव, प्रा किरण कानडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रा प्रिया सुतार यांनी मानले.
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वर्षा पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







