महात्मा गांधी जयंतीनिमित्त इचलकरंजीत “स्वच्छता जनजागृती दौड”
इचलकरंजी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने बुधवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता “स्वच्छता जनजागृती दौड” आयोजित करण्यात आली आहे.
‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारी ही दौड रा. शाहू महाराज पुतळा येथून सुरू होईल. दौडीनंतर महात्मा गांधी पुतळा येथे उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेऊन उपक्रमाची सांगता होणार आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







