रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी :
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचा ९ वा वर्धापन दिन शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी रोटरी मानव सेवा केंद्र, रोटरी भवन येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास रोटरीचे डीस्ट्रीक्ट सेक्रेटरी रो. यतिराजजी भंडारी व रोटरी सेंट्रलचे प्रेसिडेंट श्री. घनश्यामजी सावलानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाशराव सातपुते होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रोबस क्लबच्या सदस्यांनी कराओके गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. यात सुनिल कोष्टी, किरण कटके, माधवी कुलकर्णी, अरुण केटकाळे, सदाशिव काजवे, निता दोडण्णावर, जुगलकिशोर तिवारी, अलका काटकर, जगन्नाथ पोटे, मंगल डोंगरे, सुरज रवंदे, मनिषा कोष्टी, दिपाली कोळी, सनतकुमार नांदणीकर यांनी हिंदी व मराठीची सदाबहार गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
Advt
यानंतर मुख्य वर्धापन दिन कार्यक्रमास सुरुवात झाली. स्वागत सेक्रेटरी श्री. किरण कटके यांनी केले तर प्रस्ताविक अध्यक्ष श्री. सुनिल कोष्टी यांनी सादर केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार शिवबसु खोत, सूर्यकांत बिडकर, डी.एम. बिरादार, रमेश मर्दा यांनी केले. मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतामध्ये रोटरी प्रोबस क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि पुढील उपक्रमांसाठी सहकार्याची ग्वाही दिली.
संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाशराव सातपुते यांनी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला आणि भविष्यात अधिक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. क्लबचे सदस्य श्री. आप्पासाहेब कुडचे व श्री. प्रकाश आकीवाटे यांनी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप उपक्रमात प्रत्येकी दोन सायकलींचे योगदान जाहीर केले. या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात भोजनासाठी सहकार्य करणार्या प्रकाशराव सातपुते, प्रमोद लाटणे, हेमंत कवठे, बाबासाहेब पाटील-जांभळीकर, माया होगाडे, विना श्रेष्ठी, कैलास तिवारी, नीता दोडण्णावर, प्रमोदिनी देशमाने यांचा तसेच कराओके कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या समितीचे सदाशिव काजवे, अरुण केटकाळे, जुगलकिशोर तिवारी, माधवी कुलकर्णी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला आणि रोटरी प्रोबस क्लबचा ९ वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
आभार सह-सेक्रेटरी सौ. संगीता लडगे यांनी मानले. कार्यक्रमानंतर भोजन समारंभ आयोजित करण्यात आला. या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी जयश्री चौगुले, यशवंत कांबुरे, गजानन शिरगुरे, संजय चिकलगे, विजय बनसोडे, प्रदीप लडगे, रामचंद्र निमणकर, आप्पासाहेब कुडचे, अजित कोईक, जयप्रकाश शाळगावकर, काशिनाथ जगदाळे, रामदास कोळी, डॉ. कुबेर मगदूम, अनिल ज्वारे, आनंदा मेटे, वैभव डोंगरे, मल्लिकार्जुन तेग्गी, हिमांशू मिरगे, दिलीप शेट्टी, उज्वला होगाडे, प्रभाकर उरणे, सदाशिव मेटे, प्रकाश आकीवाटे, आनंदी हजारें, नंदा लकुंद्रे, राजश्री वाटेगावे, सुधीर शहाणे, काचन चोथो, अरुंधती सातपुते, गीता लाटणे, शालीनी जगदाळे, कविता कटके, निर्मला मोरे, शोभा मेटे, सुजाता कोईक, अशोक देगावकर, शैलजा मिरगे, सुरेखा मगदूम, रेखा कांबळे, डेझी कुरणे, भारती सुरपुरे, वैशाली पाटील, अंजना माळी, सुजाता चौगुले, सुनीता जोशी, रमेश पाटील आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापनदिनानिमित्त केक कापताना प्रकाश सातपुते, सुनील कोष्टी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







