इचलकरंजीत गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न
इचलकरंजी : कै. प्रकाश शंकर मगदुम स्मरणार्थ, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा–इचलकरंजी व एस.टी. फाउंडेशन स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरस्तरीय गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक सन्मान सोहळा २०२५ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकास्वामी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार दलितमित्र अशोक माने, इचलकरंजी महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी मा. श्री. बी. एम. कसार आणि महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष मा. श्री. भरत रसाळे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मा. अशोकास्वामी म्हणाले, “शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे समाज आणि देश प्रगतिपथावर वाटचाल करतो. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबर चारित्र्य आणि संस्कार जोपासावेत.”
आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “शिक्षक समाजाचा कणा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थी घडतो आणि राष्ट्राचा पाया मजबूत होतो. शिक्षण हे नोकरीसाठी नव्हे तर समाजपरिवर्तनासाठी असावे. अशा सन्मान सोहळ्यांमुळे तरुणाईला प्रेरणा मिळते.”
या वेळी शहरातील गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सन्मानप्राप्तांमध्ये मुख्याध्यापिका मा. सौ. निर्मला चौगुले, मा. कु. सुगंदा चौगुले, मुख्याध्यापक मा. श्री. किरणकुमार कोळी, मुख्याध्यापिका मा. सौ. सुचिता अलमान, शिक्षक मा. श्री. बाळासाहेब पवार व मा. श्री. आनंद कांबळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रशांत गुरव यांनी, स्वागत श्री. सचिन वारे यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. शितल खानाज यांनी केले. शहरातील शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गुणवंत शिक्षकांचा सत्कार करताना आ.राहुल आवाडे, अशोकराव स्वामी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







