ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापुरात तरुणास मारहाण — आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापुरात तरुणास मारहाण — आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी:

शहापुर येथे किरकोळ कारणावरून एका तरुणावर आठ जणांनी एकत्रित हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अरमान रझाक नायकवडी (वय २३, रा. सावली सोसायटी, शहापुर, सध्या उपचारार्थ – आय.जी.एम. हॉस्पिटल, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा परिचित अमोल हिरेमठ याने त्यांना समाधान बारजवळ बोलावले. तेथे पोहोचताच आरोपी अजित भंडारे, निलेश पारटे, विनायक शेवाळे, अमोल हिरेमठ, ओंकार सोनवणे, राकेश पाटील, संकेत माडंवकर (सर्व रा. सावली सोसायटी) व अक्षय नरळे (रा. गणेशनगर, शहापुर) यांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला.

Advt

आरोपींनी “तुला फार मस्ती आली आहे” असे म्हणत फिर्यादीचा मोबाईल फोन फोडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, गुन्हा म.पो.हे.कॉ  झुगर यांनी दाखल केला असून पुढील तपास पो.हे.कॉ. कोरे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा