कोरोची येथे भरधाव दुचाकीची सहायक फौजदारास धडक — गुन्हा दाखल
हातकणंगले (प्रतिनिधी) :
कोरोची येथील निलतारा हॉटेलसमोर शनिवारी रात्री भरधाव वेगातील दुचाकीने सहायक फौजदार सुवर्णा सागर गायकवाड (नेमणूक – शहापूर पोलीस ठाणे) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या तसेच दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले.
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश लोहार यांनी फिर्याद दिली असून, विकास तुकाराम माने (वय ३५, रा. कोरोची) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विकास माने हा आपल्या हिरो होंडा करिझ्मा R (क्र. MH-10-BH-6333) या दुचाकीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवत असताना हा अपघात घडला. पुढील तपास वडगावे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







