वीज बचतीवरील कार्यशाळा इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये संपन्न
इचलकरंजी:
महावितरण कंपनीने १ जुलै २०२५ पासून अंमलात आणलेल्या नव्या वीज रीडिंग पद्धतीसंदर्भात आणि वीज वापरातील बचतीच्या उपाययोजनांबाबत दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये कार्यशाळा पार पडली. पॉवर फॅक्टर मेंटन करणे, टी.ओ.डी. वेळेतील बदल तसेच KVAH रीडिंगमुळे होणारे परिणाम याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शक आणि उपस्थित उद्योजकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यानंतर महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सागर मारूलकर यांनी वीज नियामक आयोगाने निश्चित केलेल्या नव्या रीडिंग पद्धतीतील बदलांची माहिती दिली. त्यांनी पॉवर फॅक्टर योग्य ठेवण्यासाठी आवश्यक पॅनेल कोणती असावीत, त्यांची देखभाल कशी करावी, तसेच टी.ओ.डी. वेळेनुसार वीज वापराचे नियोजन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. तसेच KVAH रीडिंगची पद्धतही सविस्तर समजावून सांगितली.
Advt
यानंतर इनकॉन कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. संजय खोत यांनी वीज बचतीसाठी आवश्यक पद्धती, एनर्जी ऑडिटचे महत्त्व आणि त्याचा उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली.
जयप्रकाश इंजिनिअर्सचे संचालक सर्वेश राऊत आणि डेक्सटर कंट्रोलर्सचे रोहित सुतार यांनी एल.टी. आणि एच.टी. कंट्रोल पॅनल, ए.पी.एफ.सी. पॅनल तसेच हार्मोनिक्स फिल्टर आणि स्टॅबिलायझरच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
एस.पी. इंजिनिअर्सचे संचालक श्रेयश पाटील यांनी वीज बचतीसाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती दिली तसेच वीज वापराची नोंद ठेवण्यासाठी तयार केलेले नवे सॉफ्टवेअर सादर केले.
शेवटी आभार प्रदर्शन असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे यांनी केले.
या कार्यशाळेस इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसाद अवघडे, असोसिएशनचे संचालक सतीश कोष्टी, सोमाण्णा वाळकुंजे, पांडूरंग सोलगे, किरण पोवार, राजाराम गिरी तसेच उद्योजक दिपक राशिनकर, शामसुंदर मर्दा, बंडोपंत लाड, जावेद मोमीन आणि अनेक कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सागर मारुलकर यांचा सत्कार करताना चंद्रकांत पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







