ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिका सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उपायुक्त नंदू परळकर आणि अशोक कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपायुक्त विद्या कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, राहुल पोटे, राहुल राजापुरे, राहुल मजलीकर, अशोक कमते, उत्तम कांबळे, शुभम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या रविंद्रनाथ टागोर वाचनालयात ग्रंथपाल तथा महिला व बाल कल्याण अधिकारी बेबी नदाफ यांच्या उपस्थितीत डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्राचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

 

डॉ कलाम यांना अभिवादन करताना उपायुक्त नंदू परळकर,अशोक कुंभार

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा