इचलकरंजी महानगरपालिकेला “हरित यशोगाथा पुरस्कार २०२५”
इचलकरंजी :
पर्यावरण संवर्धन आणि वातावरणीय कृती स्थानिकीकरणात उल्लेखनीय कामगिरीबद्दल इचलकरंजी महानगरपालिकेला “हरित यशोगाथा पुरस्कार २०२५” ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी या घटकात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे.
हा पुरस्कार अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई ( महाराष्ट्र सहाय्यित, महाराष्ट्र वॉश एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन कोएलिशन ) आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन (माझी वसुंधरा अभियान संचालनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी गोरेगाव (मुंबई) येथील हॉल क्र. १, चॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. १ ते ३ लाख लोकसंख्या असणाऱ्या महानगरपालिकांपैकी इचलकरंजी महानगरपालिकेला भूमी घटकांतील कामगिरीबद्दल गौरव पुरस्कार मिळाला.
Advt
महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार नोडल अधिकारी उमेश कांबळे, सफाई कामगार प्रतिनिधी अनिल कांबळे (सारण विभाग) आणि श्रीमती लता भीमनाईक यांनी स्वीकारला. या यशाबद्दल मा. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, मा. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे (कोल्हे) तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
हरित यशोगाथा पुरस्कार स्वीकारताना उमेश कांबळे, सोबत आयुक्त पल्लवी पाटील, अति आयुक्त सुषमा शिंदे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







