ICHMH51NEWS.IN
9921600800

संवेदना फेलोजकडून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संवेदना फेलोजकडून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा 

इचलकरंजी:

इचलकरंजी महानगरपालिका संचलित शाळा क्र. ३४ येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात संवेदना फेलोज रोहित वनिता गजानन दळवी आणि अमित कोवे यांनी विद्यार्थ्यांना “फटाके नको… पुस्तक हवे” असा संदेश देत वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

Advt

कार्यक्रमास केंद्रप्रमुख अदिप पाटील, पर्यवेक्षक संतोष गुरव, मारुती पाटील यांच्यासह शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सुमारे ५० विद्यार्थ्यांना सृजन प्रकाशनतर्फे साने गुरुजी लिखित “माझ्या स्वप्नातील आदर्श शाळा” हे पुस्तक भेट देण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करणे, ग्रंथप्रेम वाढवणे आणि दिवाळीचा सण अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देण्यात आला.

वाचन प्रेरणा दिन साजरा करताना संवेदना फेलोज

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा