वाचाल तर वाचाल – प्राचार्य प्रो. (डॉ .)एस . के . खाडे
इचलकरंजी:
दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये डॉ . एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला . हा कार्यक्रम महाविदयालयातील ग्रंथालय विभाग , मराठी विभाग आणि समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.याप्रसंगी प्राचार्य प्रो. (डॉ ) एस के खाडे यांनी वाचाल तर वाचाल असे म्हणत ग्रंथालयात सर्व प्रकारची पुस्तके असतात . कथा , कादंबरी ,नाटक ,चरित्र , आत्मचरित्र ,आत्मकथन असे वेगवेगळ्या प्रकारचे वांग्मय वाचनासाठी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे . डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भारत देश महासत्ता होणार यावर विश्वास होता कारण त्यांचा तरुणांच्यावर विश्वास होता . प्रत्येकाने रोज किमान एक तास वाचन केले पाहिजे . अवांतर वाचनाने ज्ञानात वाढ होते . याबरोबरच दैनिक वृत्तपत्रातील मधील संपादकीय लेख वाचन केल्याने आपले विचार समृद्ध होतात . कांही वाचकांना वाचल्याशिवाय झोप येत नाही कारण वाचन करणं हे सुद्धा एक चांगले व्यसन आहे . यातून माणसाचं व्यक्तिमत्व विकास होत जातो असे मत व्यक्त केले
कार्यक्रमासाठी एन .सी .सी विभाग आणि एन .एस .एस विभाग यांचेही मोलाचे सहकार्य लाभले .
Advt
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा पाचंगे यांनी केले . याप्रसंगी अनेक विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांनी स्वतःची मनोगत व्यक्त केली तसेच संविधान वाचन करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार प्रो. डॉ . सुभाष जाधव यांनी मानले सूत्रसंचालन कुमारी संजीवनी कदम हिने केले . या प्रसंगी महाविद्यालयातील डी. ए यादव डॉ. सुभाष इंगळे आदी प्राध्यापक वृंद, समाजवादी प्रबोधिचे कार्यकर्ते,प्रबोधन वाचनालयाचे वाचक, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
फोटो-वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात प्रा.एस के खाडे व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







