असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीतर्फे जागतिक आर्किटेक्चर दिन उत्साहात
इचलकरंजी –
पाणी, हवा, सूर्य, जमीन व अवकाश या पंचमहाभूतांनी व्यापलेल्या या वसुंधरेस काही कारणाने घरघर लागत चालली आहे. ती घरघर मानवाने थांबवली नाही तर त्याचा अंत निश्चित आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आर्किटेक्ट ग्रीन बाबा प्रमोद चौगुले यांनी केले.
असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आर्किटेक्चर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रीन बिल्डिंग ॲन्ड कम्युनिटीज या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. चौगुले बोलत होते.
यावेळी जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत प्रसिद्ध आर्किटेक्ट उदय सावंत, अभय पिसे आणि सचिन बोरा यांचा ग्रीन बाबा आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचे हस्ते स्मृतीचिन्ह, शाल व फेटा देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रमोद चौगुले यांचा अल्ट्राटेक सिमेंटचे विभागीय तांत्रिक हेड शितलराज सिंदखेडे आणि टेरीटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
Advt
पुढे बोलताना श्री. चौगुले यांनी, वास्तु निर्मिती करीत असताना जगभरात 38 टक्के पर्यंतचे प्रदूषण यातून निर्माण होते. त्यामुळेच आपली सगळ्यांची ही जबाबदारी वाढते. नद्या, गाव स्वच्छ ठेवणे, वास्तू निर्मिती करताना नैसर्गिक वातावरणाचा, नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करणे आणि यातून जे तयार होते त्यास ग्रीन बिल्डिंग असे म्हणून याचे महत्त्व सर्वसामान्य मंडळींना पटवून देणे यावर अधिकाधिक भर देण्याची गरज व्यक्त केली. नैसर्गिक असमतोल जागतिक तापमान व रोगराईत होत असलेली वाढ या सगळ्यांचे मूळ प्रदूषण असून हे कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंगची गरज भासते आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून या मोठ्या कार्यासाठी हात मिळवणे गरजेचे वाटते, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे प्रेसिडेंट राजेंद्र खंडेराजुरी यांनी केले. यावेळी सुरेख नियोजनाबद्दल अल्ट्राटेक सिमेंट डीलर नितीन धूत व घनश्याम सावलानी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शितलराज सिंदखेडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटच्या टेक्निकल प्रॉडक्ट व ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट याची माहिती दिली.
यावेळी असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे सेक्रेटरी विकास नाईक, जॉ. सेक्रेटरी भरत केटकाळे, ट्रेझरर नितीन शेट्टी, विवेक सावंत, रवींद्र तोरस्कर, गिरीश मोकाशी, सुहास रुग्गे, प्रकाश मालवीय, अल्ट्राटेक सिमेंटचे हर्षल धुत, रोहित सावलानी, विभागीय तांत्रिक प्रबंधक कोल्हापूर सागर छांगाणी, चॅनेल रिलेशनशिप मॅनेजर कल्पक मेहता आदी मान्यवरांसह २०० पेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते. आभार नितीन धूत यांनी मानले.
फोटो- आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, उदय सावंत, अभय पिसे आणि सचिन बोरा यांचा सत्कार करताना शितलराज सिंदखेडे, अविनाश जेऊरकर, नितीन धूत, घनश्याम सावलानी, राजेंद्र खंडेराजुरी, विकास नाईक आदी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







