जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा — मारवल स्कूलला विजेतेपद
इचलकरंजी:
येथील मारवल स्कूलने जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
उपांत्य सामन्यात मारवल स्कूलने व्यंकटराव हायस्कूलचा पराभव केला. अंतिम सामन्यात रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचा आठ गडी राखून आणि तीन चेंडू शिल्लक ठेवत पराभव करत संघाने विजेतेपद आपल्या नावे केले. या सामन्यात ईशांत राठोड, हर्ष केशरवाणी, हिमांशु यादव व भरत चौहान यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रेक्षकांची दाद मिळवली.
या विजयानंतर संघाची चिपळूण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाच्या प्राचार्या शुभांगी पवार आणि व्यवस्थापक तेजस पवार यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. संस्थापक प्रा. नंदराज पवार यांचे मार्गदर्शन आणि क्रीडाशिक्षक अभिजित बेलेकर यांचे सहकार्य संघाच्या यशात मोलाचे ठरले.
मारवल इंग्लिश स्कुलचा विजयी क्रिकेट संघ
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







