डीकेटीई राजवाडयामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- संतवाणी मराठी गीतांचे‘ कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी:
डीकेटीईच्या राजवाडयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्यानिमित्त ‘ स्वरदीपोत्सव- संतवाणी ‘ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवार दि. २२ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वा डीकेटीईच्या राजवाडयामध्ये आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर होणार आहे. सदर कार्यक्रमात प.बाळकृष्ण बुवा मंडळ यांचे कलाकार व डीकेटीईचे वाद्यवृंदाचे विद्यार्थी संगीताची कला सादर करणार आहेत. कार्यक्रमानंतर राजवाडयावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फटाक्यांची अतिषबाजी देखील करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ संगीत श्रोत्यांनी घ्यावा व सदर कार्यक्रमास येताना पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







