विभागीय वीराचार्य मॅरॅथॉन स्पर्धा २ नोव्हेंबर रोजी
इचलकरंजी:
जैन सभा वीर सेवा दल मध्यवर्ती समिती व प्रकाश आवाडे क्रिडा अकॅडमी इचलकरंजी यांच्या वतीने वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त विभागीय वीराचार्य मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता डी.के.टी.ई. राजवाडा इचलकरंजी येथून सुरू होणार आहे.
ही मॅरॅथॉन स्पर्धा सलग चौथ्या वर्षी आयोजित केली जात असून यामध्ये एकूण १ लाख ३४ हजार रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा पुरुष खुला गट, महिला खुला गट, १४ ते १६ वर्षे, ११ ते १४ वर्षे आणि वीर सेवा दल पाठशाळा गटातील मुले व मुली अशा ७ गटांमध्ये होणार आहे. १० कि.मी. पासून १ कि.मी. पर्यंतचे वेगवेगळे अंतर या गटांनुसार निश्चित केले आहे.
या स्पर्धेला कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटना मान्यता देण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नोंदणी www.veersevadal.org या संकेतस्थळावर दि. २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत करावी. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे.
Advt
स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अनिल बमन्नावर, विजय पाटील, सचिन नवले, निखील वठारे, रवी आवाडे, चंद्रकांत पाटील, शुभम कोथळे, मोहन उपाध्ये व अनंत बोरगांवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८५०६१९९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







