ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरातील स्ट्रीटलाईट व्यवस्था विस्कळीत-उमाकांत दाभोळे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरातील स्ट्रीटलाईट व्यवस्था विस्कळीत-उमाकांत दाभोळे

इचलकरंजी

इचलकरंजी शहरातील स्ट्रीटलाईट व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दिवे बंद आहेत, तर काही दिवे दिवसाढवळ्या सुरू राहतात. गंजलेल्या आणि तुटलेल्या लाईट बॉक्स पेट्या धोकादायक स्थितीत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advt

या पार्श्वभूमीवर भाजपा इचलकरंजी पश्चिमचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने स्ट्रीटलाईट दुरुस्ती, धोकादायक पेट्यांची अदलाबदल, व दर्जेदार कामासाठी मक्तेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दाभोळे यांनी प्रशासनाला इशारा दिला की दुर्लक्ष झाल्यास जबाबदारी प्रशासनावर राहील.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा