ICHMH51NEWS.IN
9921600800

‘एस.एन. गँग’वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई — विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची मंजुरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘एस.एन. गँग’वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई — विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची मंजुरी

इचलकरंजी:
इचलकरंजी शहर व परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात ‘एस.एन. गँग’ विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईस मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.
इचलकरंजी पोलीस ठाण्यात  दाखल गुन्ह्यात फिर्यादी पुनम प्रशांत कुलकर्णी (वय ४३, रा. जैनबस्ती, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सलमान राजू नदाफ व त्याच्या नेतृत्वाखालील ‘एस.एन. गँग’ सदस्यांनी ब्यूटी पार्लरसमोर फटाके उडवत फिर्यादीवर हल्ला केला. फिर्यादीच्या डोक्यात दगड फेकून जखमी करण्यात आले तसेच परिसरातील दुकानांचे नुकसान करण्यात आले.
Advt
यामध्ये सलमान राजू नदाफ (वय २५, रा. परिट गल्ली, गांवभाग, इचलकरंजी),अविनाश विजय पडीयार (वय १९, रा. गोसावी गल्ली, इचलकरंजी),अरसलान यासीन सय्यद (वय १९, रा. सुतारमळा, जावेद मुजावर यांच्या घरी, इचलकरंजी),यश संदीप भिसे (वय १९, रा. रामनगर, शहापूर),रोहित शंकर आसाल (वय १९, रा. खोतवाडी),अनिकेत विजय पोवार (वय २२, रा. दत्तवाड)असे एकूण सहा संशयित सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या गुन्ह्याचा प्राथमिक तपास सपोनि पुनम माने यांनी केला. गुन्ह्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. योगेश कुमार यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज विभाग) श्री. आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी (इचलकरंजी) श्री. विक्रांत गायकवाड यांनी हा प्रस्ताव सादर केला.तपासादरम्यान ‘एस.एन. गँग’ ही संघटित गुन्हेगारी टोळी असून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रासह दहशत निर्माण करणे, तसेच इतर गंभीर स्वरूपाचे १७ दखलपात्र आणि १ अदखलपात्र असे एकूण १८ गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचे उघड झाले.
या सर्व बाबींचा सखोल आढावा घेत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी यांनी प्रस्तावास मान्यता देत मोक्का कलमांचा अंर्तभाव करण्यास परवानगी दिली. या मंजुरीनंतर पुढील तपासाची जबाबदारी श्री. विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी उपविभाग यांच्याकडे देण्यात आली आहे.
या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. महेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोहवा उदय करडे, पोहवा साजीद कुरणे, सहायक फौजदार सचिन पाटील आदींचा सहभाग होता.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा