ICHMH51NEWS.IN
9921600800

सौ.सुनिता जोंग राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सौ.सुनिता जोंग राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित 

इचलकरंजी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आलास (ता. शिरोळ) येथील कलाश्री डॉ. बा. ग. पवार आलास-बुबनाळ विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सुनिता बाजीराव जोंग यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Advt
मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रयोगशील शिक्षिका सौ. सुनिता जोंग यांनी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यातील
अंगभूत कलागुणांना अधिक वाव देण्याबरोबर शैक्षणिक मदत करणे, विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेवूनच त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध मान्यवर, बाजीराव जोंग, ऋषिकेश जोंग व शिक्षक उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून मोठे अभिनंदन होत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा