ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी संगांनियो बैठकीत १६६०  अर्जांना मंजुरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी संगांनियो बैठकीत १६६०  अर्जांना मंजुरी

इचलकरंजी –
संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर झालेल्या एकमेव इचलकरंजी येथील संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक शुक्रवारी समितीच्या कार्यालयात आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत तब्बल १,६६० लाभार्थींच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या अचारसंहितेनंतर २८ मार्च २०२५ रोजी समितीची शेवटची बैठक झाली होती. तब्बल सात महिन्यांनंतर झालेल्या या बैठकीत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना अशा विविध गटांतील अर्जांना मंजुरी देण्यात आली.

Advr

बैठकीनंतर आमदार राहुल आवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना “कार्यालयातील सर्व प्रकरणे शून्य प्रलंबित ठेवावीत व पात्र लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळावी,” अशा स्पष्ट सूचना दिल्या.

बैठकीस अप्पर तहसिलदार तथा समिती सचिव महेश खिलारी, हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, सदस्य सुरेश कांबळे, नायब तहसिलदार चंद्रकांत काळगे, पुरवठा निरीक्षक दिनेश आडे, अनघा होणोळे, तसेच समितीचे माजी सदस्य कोंडीबा दवडते, संजय नागुरे, सुखदेव माळकरी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत आ.राहुल आवाडे,महेश पाटील व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा