ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील बोअरवेल खोदकामाला प्रतिबंध घालावा – महाविकास आघाडी व मित्रपक्षांची आयुक्तांकडे मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील बोअरवेल खोदकामाला प्रतिबंध घालावा – महाविकास आघाडी व मित्रपक्षांची आयुक्तांकडे मागणी

इचलकरंजी –
शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व मित्रपक्ष इचलकरंजीतर्फे शुक्रवारी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले. शहरात अनिर्बंधपणे सुरू असलेल्या बोअरवेल खोदकामास तात्काळ प्रतिबंध घालावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, “इचलकरंजी शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून, त्यावर ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी बोअरवेल खोदण्यास प्रोत्साहन देत आहेत. सध्या महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे १००० तर खाजगी सुमारे ४ ते ५ हजार बोअरवेल आहेत. या सर्वांमधून दररोज दोन ते तीन एमएलडी पाणी उपसले जाते, मात्र हे पाणी पिण्यास अयोग्य आहे,” असे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या दहा वर्षांत या कारणामुळे भूजलपातळीत मोठी घट झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. अनिर्बंध बोअरवेल खोदकामामुळे महापालिकेवर वीज बिल, मेंटेनन्स, तसेच रस्त्यांवरील जीआय पाईप दुरुस्तीचा मोठा आर्थिक भार पडतो, आणि त्याचा अप्रत्यक्ष बोजा नागरिकांना कररूपाने सोसावा लागतो, असेही नमूद करण्यात आले आहे.

Advt

भूजलाचा अति उपसा थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ व २०१३” लागू केला आहे. या अधिनियमानुसार परवानगीशिवाय विंधन विहिरी खोदणे व वीज जोडणी देणे बेकायदेशीर आहे. मात्र, इचलकरंजीत या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी व मित्रपक्षांनी केला आहे.

“महानगरपालिका प्रशासनाने या अनधिकृत बोअरवेल खोदकामाकडे दुर्लक्ष केले आहे का?” असा सवाल करत, जिल्हास्तरीय भूजल व्यवस्थापन समिती व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ तपासणी करून अशा बोअरवेलवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या प्रसंगी शशांक बावचकर, सागर चाळके, सदा मलाबादे, अब्राहम आवळे, प्रकाश मोरबाळे, हेमंत वणकुद्रे, रावसो निर्मळे, वसंत कोरवी, रियाज जमादार आदी उपस्थित होते.

आयुक्तांना निवेदन देताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी

इचलकरंजी शहरात आमदार तसेच मविआशी  संबंधित काही माजी लोकप्रतिनिधी यांच्याकडून बेकायदेशीर बोअरवेल खुदाई होत असून सर्वाना आमचा विरोध आहे.

शशांक बावचकर,प्रदेश सरचिटणीस कॉंग्रेस

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा