ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रेरणा शिबिरातून इचलकरंजी मनपा शाळांमध्ये नव्या सत्राची उत्साहपूर्ण सुरुवात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेरणा शिबिरातून इचलकरंजी मनपा शाळांमध्ये नव्या सत्राची उत्साहपूर्ण सुरुवात

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या दुसऱ्या सत्राची सुरुवात एका भव्य “प्रेरणा शिबिरा” द्वारे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी श्री. बी. एम. कासार यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

श्री. कासार यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवकल्पनांवर आधारित उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. त्यांच्या सकारात्मक आणि दूरदर्शी विचारांनी संपूर्ण शिक्षकवर्गात नवचैतन्य निर्माण झाले.

Advt

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. सचिन देसाई यांनी शिक्षकांना अनुभवसमृद्ध मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक शिक्षणपद्धती, अध्यापनातील नव्या कल्पना आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांमध्ये नवीन प्रेरणा आणि उत्साहाची लाट पसरली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री. इरफान पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला, ज्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमात इचलकरंजी मनपा शाळांमधील सुमारे २६० शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रपर्यवेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र घोडकेअदीप पाटीलसौ. सुवर्णा जंगमसौ. सविता माळीसौ. गोर्वे मॅडमश्री. आंबेकर सर आणि श्री. दिलीप माने यांचे मोलाचे योगदान लाभले.

समारोपाच्या प्रसंगी मान्यवरांनी शिक्षकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी माननीय पाहुण्यांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानून या प्रेरणादायी कार्यक्रमाचा समारोप झाला.

शिक्षण विभागातर्फे द्वितीय सत्राची सुरवात करण्यात आली त्यावेळी उपस्थित मान्यवर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा