ICHMH51NEWS.IN
9921600800

इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे चांदणी चौक आयलॅंड सुशोभीकरणाचे उद्घाटन उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे चांदणी चौक आयलॅंड सुशोभीकरणाचे उद्घाटन उत्साहात

इचलकरंजी:

इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘सुंदर इचलकरंजी’ या उपक्रमांतर्गत चांदणी चौक आयलँड  सुशोभीकरणाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श राहुल आवाडे यांच्या हस्ते व इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या चेअरमन सौ. उत्कर्षा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

Advt

या प्रसंगी पास्ट चेअरमन सौ. वैशाली लोखंडे, ईएसओ सौ. हर्षदा मराठे, अध्यक्षा सौ. विभा पाटणी, सेक्रेटरी सौ. माधुरी लाहोटी, प्रोजेक्ट चेअरमन सौ. प्रेमा मर्दा उपस्थित होत्या. आमदार आवाडे यांनी इनरव्हील क्लबच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले, तर चेअरमन पाटील यांनी या प्रकल्पाला डिस्ट्रिक्टमधील उत्कृष्ट उपक्रम म्हटले.

कार्यक्रमात आमदार आवाडे, चेअरमन पाटील तसेच आयलंड डिझाइन करणारे आर्किटेक्ट बसागरे दांपत्य यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकल्पासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी लाहोटी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. मुग्धा शहा यांनी केले.

चांदणी चौक आयलँड शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा