इचलकरंजी टायगर ग्रुपतर्फे डॉ. पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप
इचलकरंजी :
टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. डॉ. तानाजीभाऊ जाधव यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या संकल्पनेनुसार इचलकरंजी टायगर ग्रुपतर्फे गोशाळेत चारा वाटप करण्यात आले. या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष वस्ताद जालिंदरभाऊ जाधव व धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिनभैय्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
Advt
टायगर ग्रुपचे रणजीत म्हेतर, सतीश जाधव, गुरुराज जोळद, अवधूत जगताप, कृष्णांत बडवे, संदीप पाटील, प्रकाश हुलमणी, रोहित जाधव, नामदेव हुलमणी आदी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे सेवाभाव, समाजोपयोगी कार्य आणि संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला. टायगर ग्रुप देशभरात सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो आणि चारा वाटप कार्यक्रम ही त्या कार्यपरंपरेचा एक भाग ठरला.
टायगर ग्रुपचे संस्थापक तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटप करताना रणजित म्हेतर व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







