वीर सेवा दल मध्यवर्ती समिती व प्रकाश आवाडे क्रीडा अकॅडमी इचलकरंजी यांचे संयुक्त विद्यमाने ‘वीराचार्य मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न
इचलकरंजी (प्रतिनिधी) —
वीर सेवा दल मध्यवर्ती समिती,प्रकाश आवाडे क्रीडा अकॅडमी आयोजित DKTE सोसायटी इचलकरंजी, प्रायोजित ॲथलेटिक्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या सहकार्याने ‘वीराचार्य मॅरेथॉन’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. इचलकरंजी शहर व ग्रामीण परिसरासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेकडो धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशभक्ती आणि मानवतेचा आणि देशभक्तीचा तसेच आरोग्यसंपन्नतेचा संदेश दिला.
Advt
मॅरेथॉनची सुरुवात इचलकरंजीचे कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पंचरंगी झेंडा दाखवून करण्यात आली.
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअरमन संजय शेटे, सकल जैन समाज अध्यक्ष गुंडाप्पा रोजे, DKTE संचालक रवी आवाडे, बाळासाहेब पाटील, शशिकांत राजोबा ,वीर सेवा दल चेअरमन विजय पाटील,चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील, अभयकुमार बागाजे ,अशोक मगदूम, सुभाष बलवान,प्रकाश दानोळे, चंद्रकांत छाजड,सुकुमार पोते, राजु दोशी, अभय बाबेल तसेच वीर सेवा दल मध्यवर्ती समिती,प्रकाश आवाडे क्रीडा अकॅडमी , महावीर जयंती उत्सव मंडळ,तसेच बोर्डिंग, शहापूर, गावभाग, कोरोची, कबनूर या वीर सेवा दलाच्या शाखा व कर्मवीर मल्टीस्टेट, विराचार्य पतसंस्था, शांतीसागर पतसंस्था, आदिनाथ बँक, वर्धमान पतसंस्था या विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Advt
ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करणेसाठी इचलकरंजी पोलिस दल, शहर वाहतूक शाखा, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय प्रशासन, एम एस आय ब्लड बँक सांगली वैभव चौगुले,मैत्री फाउंडेशन, जैन कासार समाज उन्नती मंडळ, सुनील पाटील मित्र परिवार वर्धमान सोसायटी,पार्श्वनाथ युवक मंडळ, कापड मार्केट सोसायटी यांचे विशेष सहकार्य लाभले
धावपटूंनी डी के टी ई कॉलेज राजवडा येथून प्रारंभ करून मुख्य रस्ता – गांधी पुतळा – जनता बँक चौक – शिवतीर्थ – शाहू पुतळा – कबनूर दर्गा चौक, व्यंकटेश्वरा स्कूल ते परत त्याच मार्गाने राजवाडा असा निर्धारित मार्ग पूर्ण केला. सर्व वयोगटातील स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत क्रीडाभाव जपला.
Advt
विविध गटांमधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक अनिल बम्मन्नावर,सचिन नवले , निखिल वठारे, अनिल गडकरी, राकेश चौगुले, अजित पाटील, अमोल चौगुले, शीतल पाटील, संतोष मगदूम, सुरेश मालगावे,अविनाश पाटील,संजय मगदुम, विजय गिरमल, मोहन चौगुले,शुभम कोथळे, विरकुमार हूपरे,मोहन उपाध्ये, अनंत बोरगावे, विशाल जनाज, संतोष रायनाडे, हिराचंद उगारे, उदय ऐनापुरे,सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच सर्व सह संयोजक यांनी परिश्रम घेतले.
या वेळी आयोजकांनी सांगितले की, “शारीरिक तंदुरुस्ती, देशप्रेम आणि समाजभावना वाढविण्याच्या उद्देशाने दरवर्षी अशा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येईल.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पार्श्वनाथ पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवर व सर्व सहभागी धवपटूंचे आभार मॅरेथॉनचे मुख्य संयोजक अनिल बम्मन्नावर यांनी मानले.
मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला तो क्षण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







