हायकोर्टाकडून वीजदर वाढीचा वीज नियामक आयोगाचा निकाल रद्दबातल
इचलकरंजी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र वीज नियमक आयोगाने पंचवार्षिक वीजदर वाढीवरील दि. २६ जून २०२५ रोजी दिलेला निर्णय मा.हायकोर्टाने रद्दबातल केला आहे. आयोगाने या प्रकरणात केवळ महावितरण कंपनीचे म्हणणे ऐकून घेत एकतर्फी निकाल दिला होता. मात्र, हायकोर्टाने या निर्णयावर आक्षेप घेत सर्व संघटना व ग्राहकांचे म्हणणे पुन्हा ऐकून घेण्याचे आदेश दिले आहेत.
पूर्वी आयोगाने २८ मार्च २०२५ रोजी वीजदरात ५ ते १५ टक्के कपात केली होती. परंतु, महावितरणच्या पुनर्विचार याचिकेनंतर हा निर्णय बदलण्यात आला व वीजदर वाढवण्यात आला. या वाढीव दरांविरोधात विविध संघटनांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
हायकोर्टाच्या निकालानुसार आता पुढील आदेश होईपर्यंत ग्राहकांना मार्च २०२५ च्या जुन्या दरानेच वीजबिले आकारली जाणार आहेत. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सर्व संघटना एकत्र येऊन या अन्यायकारक वीजदरवाढीला अभ्यासपूर्वक विरोध करतील.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







