गुरू कन्नन नगर मठाजवळ अज्ञात व्यक्तीकडून झाड तोडले; गाडीचे नुकसान
इचलकरंजी:
गुरू कन्नन नगर मठाजवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हायड्रोलिक कटरच्या सहाय्याने झाड तोडल्याची घटना उघडकीस आली आहे. झाड तोडल्याने तेथील स्प्लेंडर मोटारसायकलवर झाड कोसळून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलीस व महापालिका प्रशासनाला माहिती दिली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच इचलकरंजी महानगरपालिका येथे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी झाड तोडण्याच्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत तपास सुरू असून, झाड तोडणाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







