ICHMH51NEWS.IN
9921600800

भवानी कॉर्नर येथे मटका घेत असताना एकावर गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भवानी कॉर्नर येथे मटका घेत असताना एकावर गुन्हा दाखल

इचलकरंजी:

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने कबनूर ते फॅक्टरी रोडवरील भवानी कॉर्नर परिसरात मटका घेत असताना एका व्यक्तीस रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली

आरोपी गजानन पांडूरंग दैव (वय ५६, रा. बागडी गल्ली, कबनूर, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. आरोपीकडून तीन जुगाराच्या स्लिपा, एक बॉलपेन व ३१६०/- रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पो.हे.कॉ. घाटगे यांनी पो.अं. विरु रानगे यांच्या फिर्यादीवरून केली असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा