सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथे जिल्हास्तरीय युनिटी मार्च / पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
इचलकरंजी
मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार मा.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सरदार@ एकता अभियान अंतर्गत दि.३१ ऑक्टोबर ते दि.१५ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हास्तरीय युनिटी मार्च/ पदयात्रेचे आयोजन करावयाच्या आहेत . या अनुषंगाने आज रविवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी इचलकरंजी शहरात दुसऱ्या जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या पदयात्रेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते श्री शिवतीर्थ येथे करणेत आला. त्यानंतर पदयात्रा के.एल.मलाबादे चौक – महात्मा गांधी पुतळा – सुंदर बाग – व्यंकटराव हायस्कूल – शॉपिंग सेंटर – प्रांत कार्यालय – या मार्गे शिवतीर्थ येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आत्मनिर्भर भारत शपथ घेतली. शाहिर संजय जाधव यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले तसेच उमेश चौगुले यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.
या युनिटी मार्च/ पदयात्रेत उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख, राहुल डोंगरे , जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर, शिक्षण अधिकारी बि.एम.कासार, तालुका क्रीडा अधिकारी एल.जी.पवार, सहा. पोलिस निरीक्षक एस.के. वायदंडे, माजी उप नगराध्यक्ष महाविर जैन, माजी सभापती विठ्ठल चोपडे, मनोज साळुंखे, सतिश पंडित, दिलीप मुथा, प्रमोद बचाटे, अनिल डाळ्या, रणजित लायकर, उमाकांत दाभोळे,प्रा.विरुपाक्ष खानाज, प्रा.संदिप पाटील, प्रा.सचिन चव्हाण, प्रा.एफ. एन.पटेल, प्रा.पुजा परिशवाड, पी.आर. बिरनाळे, व्हि.एस. मुलानी, मुख्याध्यापक शंकर पोवार, क्रीडा अधिकारी संजय शेटे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, धनंजय पळसुले, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी यांचेसह पोलिस कर्मचारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, एन.सी.सी. / एम.सी.सी विद्यार्थी, सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
युनिटी मार्चचा शुभारंभ करताना आयुक्त पल्लवी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







