ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रो. डॉ. त्रिशला कदम यांची नियुक्ती.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रो. डॉ. त्रिशला कदम यांची नियुक्ती.

इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रोफेसर डॉ. त्रिशला कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी प्रिय प्रोफेसर डॉ. त्रिशला कदम यांच्यावर संस्थेने  पुन्हा एकदा विश्वास दाखवून प्राचार्य पदाची धुरा त्यांच्या हाती दिली आहे.

याआधी त्यांनी जून 2022 ते जुलै 2024 या कालखंडामध्ये महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी असताना खूप चांगले उपक्रम राबवले होते. विविध सुविधा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिल्या होत्या.
संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभयकुमारजी साळुंखे साहेब, कन्या महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. शैलजा साळुंखे मॅडम,सचिव माननीय सौ. शुभांगी गावडे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कौस्तुभ गावडे साहेब,  या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर त्यांनी प्राध्यापक व प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे.

पुन्हा एकदा प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा