अयोध्या कॉलनीत बंद घर फोडून ११ लाख १६ हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास.
इचलकरंजी
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अयोध्या कॉलनीतील कुरुंदवाडे मळ्यातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत अंदाजे ११ लाख १६ हजार रुपये किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी सौ. विमलादेवी शंभुनाथ केरशरवाणी (वय ५३) यांच्या बंद घराचे कडी-कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील तिजोरी उचकटून त्यातील मंगळसूत्रे, चेन, नेकलेस, अंगठ्या, झुमके, बाळ्या, माथबिंदी, चांदीची नाणी व बिस्किटे, तसेच ६ हजारांची रोख रक्कम असा ऐवज चोरून नेण्यात आला असल्याचे फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि डॉग स्क्वॉड पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
या प्रकरणी पुढील तपास पो.स.इ. साने करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







