ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापुरात तारण मिळकतीवर अतिक्रमण; न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापुरात तारण मिळकतीवर अतिक्रमण; न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

इचलकरंजी

शहापूर, ता. हातकणंगले – तारण ठेवलेल्या प्लॅटमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून अतिक्रमण केल्याप्रकरणी शहापुर पोलिसांनी तिघांविरोधात  गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी प्रविण पांडुरंग देसाई (वय 41, रा. फुलेवाडी, बोंद्रेनगर, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपी बबलू शिवानंद हाजींगे (वय 37), पूजा बबलू हाजींगे (वय 30) आणि शिवानंद तिप्पाण्णा हाजींगे (वय 59), सर्व रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, शहापुर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार आरोपी क्र. १ यांनी पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून २८ डिसेंबर २०१८ रोजी १६,८४,५४०/-रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जहप्ते न भरल्याने ही तारणमिळकत एडेलवाइस ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि., मुंबईकडे हस्तांतरित करण्यात आली. कंपनीने अनेक नोटीस देऊनही आरोपीतांनी प्रतिसाद न दिल्याने न्यायालयीन आदेशानुसार प्लॅट ताब्यात घेऊन त्यावर सिल-कुलूप लावले होते.

मात्र, दि. 9 सप्टेंबर 2025 ते 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत तसेच पुढे दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीतांनी जबरदस्तीने प्लॅटमध्ये प्रवेश करून अतिक्रमण केले. त्यामुळे त्यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीने पोलिसांत तक्रार नोंदविली. तपास पोहेकॉ 1307 बांगर करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा