बाल दिन व जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी:
१४ नोहेंबर हा दिवस दरवर्षी बालदिन म्हणून साजरा केला जातो बालदिन व जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. तसेच राष्ट्राच्या उभारणीत आपली महत्वाची भूमिका बजावणारे,स्वतंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. जागतिक मधुमेह दिनाच्या निमिताने रुग्णालयाच्या क्षयरोग तज्ञ डॉ. मानसी कदम यांनी मधुमेह त्याची कारणे, व उपाय याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. शोएब मोमिन यांनी न्यूमोनिया यशस्वीरित्या निष्क्रिय करण्यासाठी सामाजिक जागरूकता आणि कृती (SAANS) व नवजात शिशु संरक्षण सप्ताह याबद्दल मार्गदर्शन केले. या सप्ताहाचा साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे कि मुलांच्या जगण्यासाठी आणि विकासासाठी नवजात शिशु काळजीचे महत्व सामाज्याम्ध्ये जागरूकता निर्माण करणे आहे असे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विध्यार्थी- विध्यार्थीनी यांनी स्त्रीभ्रूणहत्या या विषयी संदेश देणारे एक सुंदर असे पथनाट्याचे सादरीकरण केले. तसेच रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील छोट्या मुलांनी बालकामगार व चांगला स्पर्श व वाईट स्पर्श या विषयी जागरूकता निर्माण करणारे एक सुंदर पथनाट्याचे सादरीकरण केले तसेच पोषण पुनर्वसन केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा या बद्दल माहिती देणारे एक सुंदर पथनाट्याचे सादरीकरण केले. तसेच या कार्यक्रमाच्या निमिताने बालरुग्ण विभागामार्फत पोस्टर प्रदर्शन व रांगोळी स्पर्धचे आयोजन करून विजेत्यांना बक्षीस देण्यात आले तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले बालरुग्ण तज्ञ परिचारिका यांच्या वतीने एक झिंगल चे सादरीकरण करण्यात आले . रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमित सोहनी यांनी शुभेच्छा दिल्या . बालरोगतज्ञ डॉ. संदीप मिरजकर, डॉ चंद्रशेखर लाटकर डॉ. जितेंद्र हुपरे, शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉ. बागवान, पोषण वैद्यकीय अधिकारी डॉ. करूणा बडवे रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीम. चारुशिल्पा येमल, आमदार प्रतिनिधी श्री. कपिल शेटके बालरुग्ण तज्ञ परिचारिका श्रीम. रुपाली बळीवंत, श्रीम. विद्या मगदूम, श्रीम. सोनल माने सर्व विभागाच्या परिसेविका अधिपरिचारिका बाह्यरुग्ण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मधुमेह दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर्स व कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







