ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरात ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरात ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

इचलकरंजी:

येथील आपटे वाचन मंदिराच्या वतीने शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी इयत्ता ८ वी ते १० वीतील विद्यार्थी–विद्यार्थिनींसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित केली जाणारी ही स्पर्धा बजाज सभागृहात सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत: भारतीय सणांचे बदलते स्वरूपडॉ. बाबासाहेब आंबेडकर – घटनेचे शिल्पकारकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे जादुई विश्व – फायदे व तोटेभ्रष्टाचार – समाजाला लागलेली कीडसशक्त स्त्री – बदलत्या भारताची गरज. स्पर्धकाला या विषयांपैकी एक विषय निवडून सहा मिनिटे भाषण करता येईल. प्रवेश फी रु. २० असेल.

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या क्रमांकासाठी रु. १००१ रोख, प्रशस्तीपत्र व फिरते पारितोषिक; दुसऱ्या क्रमांकासाठी रु. ७५० रोख व प्रशस्तीपत्र; तर तिसऱ्या क्रमांकासाठी रु. ५०० रोख व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांच्या शिफारशीसह (कमाल दोन नावे) व निवडलेल्या विषयाचे नाव नमूद करून आपली नोंद गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यवाह, आपटे वाचन मंदिर, राजवाडा चौक, इचलकरंजी येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ९१७५६३६२५७ वर करावी, असे संयोजकांनी आवाहन केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा