ICHMH51NEWS.IN
9921600800

महालोकअदालतीत अधिकाधिक कामे तडजोड करावीत – मा. जिल्हा न्यायाधिश जे.एल. गांधी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महालोकअदालतीत अधिकाधिक कामे तडजोड करावीत – मा. जिल्हा न्यायाधिश जे.एल. गांधी

इचलकरंजी:
इचलकरंजीत  १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय महालोक अदालतमध्ये मेडीएशनचे महत्व सांगत न्यायालयीन कामकाजावरील कामाचा भार कमी करत अधिकाधिक कामे तडजोड होणेकामी पक्षकार व वकिलांनी प्रयत्न करावा, असे आवाहन मा. जिल्हा व सत्र न्यायाधिशसो, क्र. १ श्री. जे.एल. गांधीसो यांनी केले. भारताचे विविध न्यायालयामध्ये मेडीएशन प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षक म्हणून उत्तम कार्य करीत असलेले व सुमारे पाचशेहून अधिक वकिलांना व आठशेहून अधिक न्यायाधिशांना मेडीएशनबाबत सन २०१४ पासून मेडीएशनचे प्रशिक्षण देणेचे गौरवपुर्ण कार्य केलेले मा. न्यायाधिशसोो श्री. जे.एल. गांधी साहेब यांनी अधिकाधिक कामे आपसात तडजोड होणेबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी सिनिअर अॅडव्होकेट इरफान जमादार, अरविंद खानविलकर (रेंदाळकर) यांनी विविध सूचना केल्या.
दि इचलकरंजी बार असोसिएशन तर्फे आयोजित राष्ट्रीय महालोक अदालत पूर्व तयारी बैठकीत मा. जिल्हा न्यायाधिशसो श्री. जे. एल. गांधीसा, मा. जिल्हा न्यायाधिशसोो क्र.२ श्री. मिलींद भोसलेसोो, मा. दिवाणी न्यायाधिशसो, वरिष्ठ स्तर मा. श्री. जी.एम नदाफसा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मा. न्यायाधिशसोो पी.एन. रोकडेसोो, मा. न्यायाधिशसोो आर.डी. खराटे मॅडम, मा. न्यायाधिशसोा डी. बी. साठेसोो, मा. न्यायाधिशसो ए.आर. कुलकर्णीसोो व मा. न्यायाधिशसो एम.एस. गावडे मॅडम उपस्थित होते.
यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, क्लार्क प्रविणभाऊ फगरे, विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरजकर, अभिजीत माने व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
लोक अदालती बाबत मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश जे.एल.गांधी 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा