ICHMH51NEWS.IN
9921600800

प्लेअर्स मावा तयार करणारा युवकावर अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा; २०,९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्लेअर्स मावा तयार करणारा युवकावर अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा; २०,९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) कोल्हापूरच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान तीनबत्ती चौक परिसरात गुप्त माहितीनुसार कारवाई करून प्लेअर्स मावा व सुगंधी तंबाखू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा मोठा साठा जप्त केला. २५ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय गणपती तावरे (वय २९, रा. मासाळ गल्ली, जवाहरनगर, इचलकरंजी) याच्या घरात प्लेअर्स मावा तयार करण्यासाठी लागणारी कच्ची सुपारी, विविध ब्रँडची सुगंधी तंबाखू, पान मसाला, मिराज, आरएमडी, विमल, रजनीगंधा आदी पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. तसेच एक डिजिटल वजन काट्यासह एकूण 20,955 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कच्ची सुपारी व सुगंधी तंबाखूचे सेवन कर्करोगासह अनेक आजारांना कारणीभूत ठरते. तसेच या पदार्थांवर शासनाने बंदी असतानाही आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा साठा करून ठेवला होता, असे फिर्यादी पो.हे.कॉ. सागर चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल असुम सपोनि गोडसे पुढील तपास पो.नि. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

मावा व्यवसायास कुणाचे पाठबळ
इचलकरंजी शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात प्लेयर्स माव्याच्या फ्रंचायसी दिलेल्या आहेत, गेल्या ४ महिन्यांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईने अनेक पानपट्टी वरील फलक काढून त्याना साधा पान विक्रीचा व्यवसाय काही दिवस करावा लागला होता,मात्र काही राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने परत फलक लागले व व्यवसाय सुरू झाले आता कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष उघडकीस आले आहे,त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाणे कुणाच्या दबावात काम करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक पोलिसांची पथके कुचकामी
इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसात अवैध गॅस भरणे,गुटखा,मावा प्रकरणी कोल्हापूर गुन्हे शाखेने कारवाया केल्या आहेत,येथील स्थानिक पोलिसांचे गुन्हे शोध पथक,तसेच पोलीस कर्मचारी यांना हे दिसत नाही का? दिसत असून कारवाई होत नसेल तर यामागे कोणते गौडबंगाल आहे याबाबत नागरिक आता उघड चर्चा करत आहेत.

जुजबी कारवाईस टाळून मुळापर्यत जाण्याची गरज
लोकप्रतिनिधी तसेच कोल्हापूरातून येऊन पोलीस धाडी टाकतात व कारवाई करतात मात्र स्थानिक पोलीस स्टेशन काय करत असते,बऱ्याच वेळा राजकीय दबावात जुजबी कारवाई करून सोडून दिले जाते,शासन स्तरावर नशिले पदार्थ तसेच गुटखा विक्री करणाऱ्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे असे असताना मावा कारवाईत मुळापर्यत जाण्यात पोलीस खाते का अपयशी ठरत आहे याचाही विचार वरिष्ठ स्तरावर होणे आवश्यक आहे.

अन्न औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कारवाई आवश्यक.
लोकप्रतिनिधी विधानसभेत नशेखोरी बद्दल आवाज उठवतात मात्र कारवाई जुजबी होते,
इचलकरंजी शहरातील नशेखोरी मोडून काढायची असली तर अन्न औषध प्रशासन व पोलीस दलाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे तरच नशेखोरीस आळा बसेल.कायद्याच्या पळवाटा शोधून आरोपी जामीन मिळवण्यात यशस्वी होतात यावरही चांगले कायदेतज्ञ देऊन चिंतन होणे आवश्यक आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा