इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागात रोड स्विपींग मशीन दाखल
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील दैनंदिन साफसफाई करिता १.४ घन मीटर क्षमतेचे ट्रक माउंटेड नॅनो रोड स्विपिंग मशीन खरेदी करण्यात आलेले आहे.
या मशीनचे पुजन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या नॅनो रोड स्विपिंग मशीनचा वापर शहरातील मुख्य रस्ते सफाईसाठी होणार असल्यामुळे शहर स्वच्छतेमध्ये गतिमानता येणार आहे.
यावेळी उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत सहा. आयुक्त रोशनी गोडे, सहा आयुक्त सुनील शिंदे, सहा.आयुक्त नितिन बनगे, क्रिडा अधिकारी संजय शेटे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे आदिंसह महानगर पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नॅनो रोड स्विपिंग मशीनचे पूजन करताना आयुक्त पल्लवी पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








