दारूच्या अति सेवनामुळे इचलकरंजीतील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
इचलकरंजी
इचलकरंजीतील मनोज वर्धमान भुते (वय ४७, रा. कलानगर) यांचा दारूचे अति सेवन झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. १७ ऑक्टोबर रोजी बेशुद्ध अवस्थेत असताना पत्नीने त्यांना सांगली-मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मयत नोंद पोहेकॉ 1797 घाटगे यांनी केली असून पुढील तपास पो.ना. कांबळे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







