भरवस्तीत दुकानाचे शटर उचकटून ९४,४०० रुपयांची चोरी
इचलकरंजी :
राजाराम स्टेडियममधील गाळा क्रमांक ३२ येथील नंदनवन कृषी सेवा केंद्र या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने तब्बल ९४,४०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी रात्री ते सोमवारी या कालावधीत घडला आहे. याबाबत फिर्यादी अशोक शामराव बिडकर (वय ४९, रा. दत्त कॉलनी, सांगली रोड, इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा नोंद झाला आहे.
चोरट्याने दुकानाचे एक लॉक कापून तर दुसरे उचकटून आत प्रवेश करून रोख रक्कम, सोन्याचे लॉकेट, विविध कंपन्यांची शेतमाल बियाणे पाकिटे, किटकनाशके आणि इतर कृषी साहित्य असा एकूण ९४,४०० किमतीचा माल लंपास केला. पोहेकॉ घाटगे यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




