ICHMH51NEWS.IN
9921600800

वृद्धेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध कारवाईची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वृद्धेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध कारवाईची मागणी

इचलकरंजी:

७२ वर्षीय आसमा सलामतुल्ला खान रा.सनदी मळा कबनुर यांनी औषध सेवन करून पंचगंगा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. तेथून जात असलेले आ.राहुल आवाडे यांनी त्वरित मदत करून त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वृद्धेने आपल्या सुनेसहित आठ जणांची नावे सांगत त्यांच्यावर मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि अप्पर पोलीस अधीक्षक (डीवायएसपी) यांच्याकडे अर्जाद्वारे केला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी घरावर कब्जा घेणे, वारंवार धमक्या देणे आणि शिवीगाळ करणे अशा मार्गाने मानसिक त्रास दिला, ज्यामुळे ती आत्महत्येस प्रवृत्त झाली. पिडीत महिलेने अर्जात या सात जणांबरोबर सुनेच्या माहेरच्या लोकांकडूनही स्वतः आणि मुलाच्या जिवितास धोका असल्याचा उल्लेख केला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पो.नि गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार महिलेवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार रीतसर तक्रार दाखल केली जाईल.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा